Slide 2

डॅशबोर्ड (प्राप्त झालेले अर्ज)

350

ठाणे

1078

नवीमुंबई

अर्जाची सद्यस्थिती

जनता दरबार

जनता दरबार

नागरिकांच्या अडीअडचणी, समस्यांचे थेट निराकरण करणारे प्रभावी माध्यम म्हणजे – जनता दरबार.

आपल्या मंत्रीपदाच्या प्रत्येक कालावधीत अगदी सुरूवातीपासून म्हणजे 1995 पासून अधिकारीवर्गासमवेत जनतेला एकत्र घेऊन जनता दरबारच्या रूपाने थेट सुसंवादाचे आयोजन केले जात असल्याने ‘जनता दरबार’ म्हणजे ना.श्री.गणेश नाईक हे समीकरण सर्वमान्य आहे.

मा.पंतप्रधान श्री.नरेंद्रजी मोदी यांचे सर्वसामान्य माणसाचे कल्याण हे ध्येय नजरेसमोर ठेवून सुशासन साकारण्याचे उद्दिष्ट आणि त्याला पूरक अशी पारदर्शक आणि कार्यक्षम प्रशासन राबविण्याची मा.मुख्यमंत्री श्री.देवेंद्रजी फडणवीस यांची भूमिका याला साजेसा असा जनता दरबारचा उपक्रम म्हणजे नागरिकांना आपले काम मार्गी लागेल असा विश्वास आणि दिलासा देणारा लोकाभिमुख उपक्रम !

मंत्रालय स्तरावर कामे होतातच तथापि जिल्हास्तरावर, तालुकास्तरावर किंवा शहराच्या ठिकाणी नागरिकांची समक्ष भेट घेऊन त्यांच्या जास्तीत जास्त अडचणी/समस्या जाणून घेणे आणि त्यांचे निराकरण तात्काळ त्याच ठिकाणी करणे हा जनता दरबार घेण्यामागील उद्देश आहे.

जनता दरबारच्या माध्यमातून नागरिकांची प्रलंबित कामे मार्गी लागत असल्याने जनतेचा शासन प्रक्रियेवरील विश्वास वाढत असून प्रशासनावरही विहित वेळेत कामे पूर्ण करण्याचे उत्तरदायित्व पार पाडण्याची जबाबदारी येत आहे. शासनाच्या निर्णय प्रक्रियेला गतीमान करणारा ‘जनता दरबार’ हा उपक्रम शासन व जनता यामधला परिणामकारक सेतू आहे.

जनता दरबारच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्यांचे निराकरण व्हावे व एक दिवस असा यावा की जनता दरबारमध्ये एकाही नागरिकाला उपस्थित रहावे लागू नये ही ना.श्री.गणेश नाईक यांची भूमिका असून त्याच दिवशी जनता दरबारचा हेतू सर्वार्थाने साध्य झाल्याचे समाधान लाभेल अशी त्यांची भावना आहे.

:- गणेश नाईक

Ganesh Naik

मीडिया गॅलरी